सुनील रामटेके
शहर प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : सन १९४९ च्या व्यवस्थापन कायद्यात दुरुस्ती करुन बुद्धगया येथिल महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्य्यात द्या.या मागणीसाठी भद्रावती शहरात सोमवार दिनांक २१ एप्रिल ला बौद्ध समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करन्यात आले.या आंदोलनात अनेक उपासक व उपासकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेवुन आंदोलनाला जोरदार पाठींबा दर्शविला.बौद्ध समाज संघटनेच्या वतीने विंजासन बौद्धलेणी प्रवेशद्वार ते तहसील कार्यालय पर्यंत विविध मागण्या घेवुन विशाल जनआक्रोश मोर्चा काढन्यात आला होता.मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यावर तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे बुद्धगया येथिल महाबोधि महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्य्यात द्या,अशी मागणी सरकार कडे करन्यात आली.बौद्धसमाज संघटनेच्या भावना शासनाकडे कळविनार असल्याचे आश्वासन या प्रसंगी ऊपस्थित जनसमुदायास तहसीलदार साहेबांनी दीले.तत्पुर्वी मोर्चात सहभागी असलेल्या आंदोलकांना पुज्य भंते ज्ञानज्योति महाथेरो संघ रामगिरी चिमुर, पुज्य भंते सच्चे थेरो भद्रावती व पुज्य भिक्खुणी सुबोधी भद्रावती यांनी मार्गदर्शन केले.सर्वश्री भुपेंद्र रायपुरे सर,खुशाल मेश्राम, शंकर मुन, अमित नगराळे,सुरज गावंडे,विशाल बोरकर, राजरत्न पेटकर,विकास दुर्योधन,उमेश रामटेके,कपुरदास दुपारे, विठ्ठल पुनवटकर, जयदेव खांडे,बंडु देवगडे,सर्वेश चहांदे ई. बौद्ध बांधव व महिला ऊपस्थित होत्या.


