मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण.बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चक्री जुगार अड्डे पुन्हा चालू झाले असून. पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. बिडकीन,चितेगाव परीसरातील चक्री जुगार बाबत काही दिवसांपूर्वी सुरक्षा असंघटित कामगार संघटनेच्या वतीने चक्री जुगार अड्डे बंद करावे याकरिता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते चक्री जुगार अड्डे बंद न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासनाने काही काळ बिडकीन चितेगाव हद्दीतील चक्री जुगार अड्डे बंद केल्याचे दिसून आले.चक्री जुगार अड्डे बंद झाल्याचे दिसून असल्याने सुरक्षा कामगार संघटनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना चक्री जुगार अड्डे बंद झाले असून ठिय्या आंदोलन स्थगित करत असल्याचे कळवण्यात आले.परंतु लगेच काही दिवसात सांगड घालून अवैध चक्री जुगार व्यावसायिक यांनी पुन्हा मुंडके वर काढले असून.जैसे थे वैसे परत ऑनलाईन चक्री जुगार अड्डे चालू केले आहे. बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत चक्री जुगार अंड्याचा मोठ्या प्रमाणात खुलेआम खेळ चालू आहे.चक्री जुगार मुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग बरबाद होत असून अनेकांचे संसार धुळीस मिळत आहे. चक्री खेळणाऱ्या व्यक्तीच्या घरावर आर्थिक संकट येत असून त्याचा त्रास घरातील लहान मोठ्या व्यक्तीणा सहन करावा लागत आहे.चक्री जुगार हा एक प्रकारे विषारी वायर्स असून कामगार कष्टकरी यांना खेळाच्या आहारी लाऊन नाहक त्यांचा आर्थिक बळी घेतल्या जात आहे. जनतेचे रक्षण करते जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांनी नियमबाह्य चालणाऱ्या चक्री जुगार खेळावर तात्काळ बंदी घातली असे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केले जात आहे.


