राजु बडेरे
ग्रामीण प्रतिनिधी जळगाव (जा)
राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ कार्यान्वीत असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम २०२२ तयार केले आहेत. राज्यात मागील ६ वर्षात ५४२१ बालविवाह थांबवण्यात आले असुन ४०१ एफ.आय.आर दाखल करण्यात आले आहे.अक्षय तृतीया हा दिवस दि.३० एप्रिल २०२५ रोजी आहे या दिवशी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात सामुहीक विवाह सोहळे तसेच वैयक्तीक विवाह सोहळे आयोतीत केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठया प्रमाणात होण्याची शक्यता असते बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपुर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजीत करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे शहरी भागाकरीता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असुन ग्रामसेवक हे ग्रामीण भागाकरीता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असुन त्यांना सहायक म्हणूनअंगणवाडी सेवीका आहेत. गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत असुन सरपंच हे ग्राम बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील, आशा सेवीका हे त्या समितीचे सदस्य आहेत वअंगणवाडी सेवीका सदस्य सचिव आहेत त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधीतकोणतीही अघटीत घटना होणार नाही या बाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, भंतेजी तसेच मंडपवाले, वाजंत्री, विवाह सोहळ्यात सहभागी होणारी वराडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वर वधुचे आई वडील यांना शिक्षा होवु शकते. गावात बालविवाह झाल्यास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका यांच्या वर कार्यवाही प्रस्तावीत केल्या जावु शकते दि.११ एप्रिल २०२५ रोजी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवकयांच्या जिल्हा स्तरीय बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेमध्ये सर्व ग्रामसेवक यांना गावात बालविवाह होवु नये यासाठी जागरूक राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेल्या आहे. गावात विवाह ठरले असल्यास मुला मुलींच्या वयाची खातरजमा सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व अंगणवाडी सेवीका यांनी करणे आवश्यक आहे. बालविवाह बाबत काही माहीती असल्यास टोल फ्रीकमांक १०९८ व ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.


