भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : विदर्भ मराठवाड्यातील वाहतूकीतील महत्वाचा दुवा असलेल्या धनोडा पुल नविन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुलाच्या दोन्ही बाजुकडील भराव अध्याप पर्यंत भरला नसल्याने जुन्या पुलावरून रहदारी चालू असुन सदर पुलावरची वाहतूक पुलावरून पाणी असल्याने सध्या स्थितीत बंद आहे.पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्याचे ईसापुर धरण नियंत्रण कक्षाकडुन नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ईसापुर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंटीमीटर ने उघडण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रात ८३१३ क्युसेक्स (२३५,३८२) क्युमेक्स इतका विसर्ग चालू असताना सकाळ पासून मुसळधार तर अतिवृष्टी सारखा पाऊस साधारण दोन तास पडल्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन अंदाजे दुपारी चार वाजता धनोड पुलावरून पाणी वाहु लागले असल्याने (नागरिकांच्या) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व कोणत्याही वाहनांनी पुलावरून पाणी असताना पुल ओलांडुनये करीता सतर्कतेच्या दृष्टीने माहुर पोलिस ठाण्याचे पोलिस, होमगार्ड, महीला पोलीस कर्मचारी सह पोलीस उपनिरीक्षक जाधव व एपी आय पालसिंग ब्राह्मण साहेब माहुर कडून धनोडा पुलाच्या अलीकडे हजर होते. तसेच यात्रेकरुच्या वाहनासह एसटी महामंडळ बस सुध्दा अलीकडेच थांबुन माहुर पोलिस प्रशासन पहारा देत होते. पुलावरचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता वाढत होती.पण माहुर पोलिस प्रशासन पोलीस निरीक्षक गणेश कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना सतर्क करून पाहरा देत होते.











