पातूर तालुका प्रतिनिधी
स्थानिक कवी, कलावंत आणि लोकप्रिय पत्रकार
श्री. देवानंद गहिले यांच्या वाढदिवसानिमित्त “एक दिवस कलेचा” या सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन
४ जुलै २०२५ रोजी पातूर येथील संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृहात करण्यात आले. या वेळी नृत्य, गायन, कवी संमेलन यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पुस्तक पूजनाने झाली. यानंतर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. शोभाताई मेहेर, विस्तार अधिकारी प्रवीण डाबेराव, विस्तार अधिकारी शिक्षण गजानन बोचरे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, विदर्भ अध्यक्ष वासुदेवराव खोपडे, केंद्रीय संघटक डॉ. शांतीलाल चव्हाण, मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजूसे, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर भाऊ, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर लाड, प्रसिद्ध गायक देविदास नीलखन, संगीततज्ञ प्रा. विलासराव राऊत, ग्राहक पंचायतचे दिनेश पांडे, संघटन मंत्री, मंजित देशमुख, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तसेच पातूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर, इरफान शेख (24 न्यूज), रमेश देवकर, संजय गोतरकर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली निकम,
ओबीसी सेलच्या अकोला महानगर अध्यक्ष सौ. वर्षाताई पिसोडे, सौ.दिपमाला गहिले,नायब तहसीलदार बळीराम चव्हाण, गायक कलावंत पूजा मालोकार, शिल्पा बुदे, विद्या सुरोशे, संपादक सय्यद जमीर खान जेके, ग्राहक पंचायत चे पदाधिकारी विनोद मेहरे, प्रमोद बोरकर, विजय बहाकर,
प्रा. विठोबा गवई, प्रल्हादराव बोचरे, विस्तार अधिकारी श्री. बोचरे आदींचा समावेश होता.
यावेळी परिसेविका रश्मी बद्दूरकर, अधिपरिचारिका मीनल कुलकर्णी, डॉ. शुभम लहांमगे, डॉ. नूतन लहांमगे,शिव महिला बचत गट, प्रा. करुणा गवई, वनरक्षक मोहन सिंग राठोड, डॉ. एस बी गवई, डॉ. श्रीकांत बोरकर, ह. भ. प. कुमारी तेजस्विनी रवींद्र फाटकर बाल कीर्तनकार, बाल कलावंत गायक अर्जुन संदीप बर्डे,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करुणा गवई यांनी केले. प्रास्ताविक कृष्णराव घाडगे यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण अंधारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीताई गाडगे, विनोद इंगळे, संतोष उपरवट, प्रेमचंद शर्मा, उर्मिला गाडगे, विनोद बोरकर, ज्योती बोरकर, रवी मेसरे, साधनाताई इंगळे, सुनील लव्हाळे, देवानंद गवई, दिनकर बोदडे, प्रल्हाद गवई, किशोर राखोंडे, अमोल राऊत, प्रा. मुकुंद कवळकार, प्रा. वसंत गाडगे, छोटूभाऊ जोशी, नंदकुमार ठक, सय्यद हसन बाबू, जुबेर शेख, प्रज्वल इंगळे, सुरेश डाबेराव, अमोल करवते, रुपेश इंगळे, सुहास देवकर, सौ सुप्रिया इंगळे, गणेश ढाकरे, समीक्षा इंगळे, बाळाभाऊ सरोदे, मानसी दाते, दमन टेंभुर्णीकर, गणेश लहांमगे, माणिकराव ठाकरे, सौ वर्षा पातूरे, सौ. अश्विनी आवटे, श्रीकृष्ण इंगळे सौ. शालिनी शर्मा, सौ. स्वाती इंगळे, सौ. उज्वला राखोडे, सुधाकर उगले यांच्यासह विविध संस्था, अंकुर साहित्य साहित्य संघ, स्टार गायक कलावंत ग्रुप, ग्राहक पंचायत, मराठी पत्रकार संघ, लोकमत सखी मंच तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, सांस्कृतिक गटांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात रिल मास्टर ज्ञानदेव म्हात्रे यांनी नृत्य कला सादर केली तर कवितांनी आणि गीत गायनाने हा कार्यक्रम प्रचंड जल्लोषमय झाला
या कार्यक्रमाच्या माध्यमातून पातूर नगरीत सांस्कृतिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले आणि कलेच्या क्षेत्रातील नव्या प्रतिभांना व्यासपीठ मिळाले.


