नागनाथ भंडारे
सर्कल प्रतिनिधी आरळी
कुंडलवाडी, आरळी दि. २३- यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, भर दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होत आहे. आरळी, कुंडलवाडी शहराचे तापमान ३८. ० ते ४१. ० अंशावर गेल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिवस आहे.
यावर्षी मार्च पासून उन्हाच्या प्रचड झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास नकोसा झाला आहे. भर दुपारी रस्त्यावरील वाहतूक तुरलक आहे. तसेच कुंडलवाडी च्या बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत आहे. विविध कामाच्या निमिताने घराबाहेर पडलेले वृक्षाच्या सावलीचा आसरा घेत आहेत. उन्हापासून बचावासाठी दुचाकीस्वार हेल्मेट, स्कार्फ, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. यातूनच घामाघूम होऊन रसवंतीगृह, शीतपेयाची ठिकाणे शोधत आहेत. सर्वञ पंखे, कूलर तसेच एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणीही मोठी वाढली आहे. एप्रिल व मे महिना हा दरवर्षीच कडक उन्हाचा असतो. अशा या कडक उन्हामध्ये नागरिकांनी जास्त गरम किंवा जास्त थंड पेय पिऊ नये. उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, गार पाण्याने हातपाय, डोके धुऊन पाच, दहा मिनिटानतर पाणी प्यावे, दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, बाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधणे, अति आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन वैधकीय अधिकारी डॉक्टर तानाजी सूर्यवंशी यांनी केले आहे.


