अविनाश पोहरे
ब्युरो चीफ, अकोला
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसी कॅडेट यांचा ए सर्टिफिकेट कोर्सचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला च्या अंतर्गत असलेल्या युनिट चा ए सर्टिफिकेट 2024-25 चा निकाल लागलेला आहे. याकरिता विद्यालयातील 43 जेडी, जेडब्ल्यू परीक्षेला बसले व 43 उत्कृष्ट निकाल घेत पास झालेली आहेत. ही परीक्षा इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कर्नल विजय नारायण शुक्ला व ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनात ही परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा लेखी व प्रात्यक्षिक स्वरूपाची असते. त्यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी कॅडेट ने उत्कृष्ट सहभाग घेत परीक्षा सर्व एनसीसी कॅडेट ही प्रथम श्रेणी पास केलेली आहे.एनसीसी चे काय काय फायदे आहेत व त्याचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे आपल्याला उपयोग होतो याबाबतीत सविस्तर माहिती उपप्राचार्य एस बी चव्हाण सर यांनी दिली.युनिटी आणि डिसिप्लिन याचे महत्त्व सांगत कशाप्रकारे आपण देशासाठी उत्तम नागरिक घडवू शकतो याबाबतीत प्रकाश शाळेच्या उपमुख्याध्यापिका आर एस ठेंगे यांनी टाकला.एनसीसी कॅडेटच्या यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटी, पातुर चे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव सौ स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उप प्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर एस ठेंगे, पर्यवेक्षिका पी एम कारस्ककर, पर्यवेक्षक एस आर मुखाडे, यांनी कौतुक केले.एनसीसी कॅडेटला मोलाचे मार्गदर्शन एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांचे लाभले. सर्टिफिकेट वितरित करण्याकरिता इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे पिया स्टाफ शशी कपूर व राजेश थापा हे स्वतः उपस्थित होते.


