मारोती सुर्यवंशी
तालुका प्रतिनिधी नायगाव
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बदल करतांना कल्पक दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन पुर्ण तालुक्याच्या कामाचा भार हलका करण्यासाठी परीणामी जनतेची कामे वेळेवर होण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच नायगाव तालुक्याला दोन अध्यक्ष दिले असून.नायगाव तालुका उत्तर विभाग अध्यक्ष बालाजी मद्देवाड व नायगाव तालुका दक्षिण विभाग “कर्म हिच पूजा” असे मानुन कार्य करणारे श्रीहरी देशमुख नरंगलकर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रसंगी आ. राजेश पवार यांच्या उपस्थितीत दि. २० एप्रिल २०२५ रोजी पार पडल्या आहेत.
तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया भाजपच्या संपर्क कार्यालयात पार पडली असून जिल्हा सरचिटणीस माधवराव उच्चेकर यांनी निवडीची घोषणा केली आहे. बरबडा कुंटूर व नायगावची जबाबदारी बालाजी मद्देवाड तर नरसी मांजरमची जबाबदारी आ. राजेश पवारांचे निष्ठावंत श्रीहरी देशमुख नरंगलकर यांच्यावर सोपवण्यात आली.
भाजप तालुकाध्यक्ष निवडीला प्राचार्य मनोहर पवार, सरपंच रजित कुरे, शिवा गडगेकर, माधव कल्याण, महेश देशपांडे, सोपान पाटील, युवराज लालवंडीकर, राजु बेळगे, राजेंद्र कुचेलीकर, गंगाधर कल्याण, आवकाश धुप्पेकर, शिवाजी पळसगावकर, गजानन जुन्ने, परमेश्वर धानोरकर, गजानन कदम, नागोराव भेडेकर, परबतराव कुष्णुरकर, सोपान कदम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. बालाजी मदेवाड व श्रीहरी देशमुख नरंगलकर यांच्या नावाची घोषणा होतात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व दोघांनाही भावी कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.


