मारोती सुर्यवंशी
तालुका प्रतिनिधी नायगाव
नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील गुत्तेदार यांनी जिल्हा पंचवार्षिक योजनेतून पाच लक्ष रुपयाची रस्त्याचे काम केले परंतु ते काम निष्कृष्ट दर्जाचे अंदाजपत्रकामध्ये दाखवलेल्या जागी केले नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती कांबळे व मिलींद बच्छाव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांना दिली होती त्यांच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते मारुती कांबळे यांनी दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पासून आमरण उपोषण करण्याचे निवेदन पंचायत समिती नायगाव येथे सादर केली होती त्यामुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी डी आय होनराव उपअभियंता उपविभाग बांधकाम नायगाव व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.एम.नीलमवार यांचे आज जाय मोक्यावर जाऊन चौकशीचे व सदर कामाची बिल अदा करण्यात येऊ नये असेआदेश काढते आहे तसेच दुसरी चालू असलेले काम पेव्हर ब्लॉक बसवणे व सी सी रस्ता आणि सी सी नाली हे सुद्धा काम अत्यंत निष्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे त्याची सुद्धा चौकशी जाय मोक्यावर येऊन करावी असे असे आदेशामध्ये विकास अधिकारी यांनी सांगितले आहे तरी या बोगस कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होईल का असे जनतेतून बोलले जात आहे.


