आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पाली :- सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायतीचा सरपंच प्रणिता खाडे यांना कोकण विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरवून त्यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रसंगी त्यांना अपात्र ठरवले आहे. सरपंच प्रणिता खाडे यांनी कायद्याने बंधनकारक असलेल्या महिला ग्रामसभा घेतल्या नाहीत.तसेच शासनाचा माहितीचा अधिकार घेतला नाही. तसेच ग्रामपंचायत लेटरहेडचा वापर करून ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीत कॉन्ट्रॅक्ट ची मागणी करुन आपला मनमानी कारभार चालवला असे तक्रारीत श्री. नरेंद्र खाडे यांनी मा. कोकण आयुक्त यांचा कडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मा. आयुक्त यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी अलिबाग यांचा अहवाल विचारात घेऊन, सरपंच खाडे यांना आपले सरपंच पद रिक्त करण्याचे आदेश दिले.अशी माहिती नरेंद्र खाडे साहेब यांनी दिली.


