करामत शाह
तालुका प्रतिनिधी, अकोला
आगर : – निभोंरा येथील जनतेचे विश्वासू सरपंच आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते प्रा. नितिन सुभाष ताथोड यांची राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. ताथोड हे श्री. सुभाषराव ताथोड यांचे सुपुत्र असून, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शक प्रशासन, ग्रामविकास, वंचित घटकांचे सशक्तीकरण आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वगुणांची दखल घेत संघटनेने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.या निवडीच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष ठाकुर चंदन सिंग (बिहार), राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदित्य उपाध्याय (छत्तीसगड), राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके (महाराष्ट्र), अरुण शर्मा (जम्मू-काश्मीर), सचिव रविंद्र यादव (उत्तर प्रदेश), महासचिव मुकेश सकीया (गुजरात) आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद पांडुरंग सांगोले यांनी प्रा. ताथोड यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडून संघटनेच्या कार्यात नवे आयाम मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
याशिवाय कोअर कमिटी सदस्य प्रेम साहू (छत्तीसगड), प्रवक्ते जयराम गौरव, महेंद्र यादव (झारखंड), अर्पिता पांडा (उडिसा), ईश्वर साहू (छत्तीसगड), गोवा प्रदेश अध्यक्ष प्रभारी पद्माकर मलीक, सुबत्ता सामंत, महाराष्ट्र प्रभारी सुनिल पाटील (जळगाव), कार्याध्यक्ष अरुण देवढे, उपाध्यक्ष रवि पाटील, सेवक नागवंशी, सुनिता सुतार (महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा), सौ. जयश्री वंजारी (महिला कार्याध्यक्षा), मंगेश तायडे, राजकुमार मेश्राम, लक्ष्मण करारे, डॉ. शंकर ठाकरे (अमरावती), नागपूर विभागीय अध्यक्ष लक्ष्मण करारे, आणि सुशिल रामटेके यांनीही अभिनंदन व्यक्त करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा. नितिन ताथोड यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्यातील सरपंच आणि ग्रामविकास प्रतिनिधींना प्रभावी मार्गदर्शन आणि बळकटी मिळेल, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.


