भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्यातील ९५ गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बुडीत टाकु पाहना-या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम दिनांक ७ मे रोजी पाटबंधारे विभागाने सुरू केल्याची माहिती मिळताच बुडीत क्षेत्रातील शेतकरी आणि धरण विरोधी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला. या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, विदर्भ-मराठवाडाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह खंबाळा येथे धडक दिली आणि सुरू असलेले धरणाचे काम बंद पाडले.काम सुरु झाल्याची बातमी समजताच दुसऱ्याच दिवशी सकाळी १० वाजता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धरण रेषेवरील काम रोखण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन उपस्थित होते.या आंदोलनात पुढील मान्यवरांची उपस्थिती होती, संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर, संघटक सचिव प्रल्हादराव गांवडे सर, बंडू नाईक, विजय पाटील राऊत, विजय समगिर, बंटी पाटील जोमदे, निलेश कुमरे, माणिक कोवे, गुलाब मेश्राम, विजय पाझारे, गजानन डाखोरे, जयराम मिश्रा, विठ्ठलराव अडकिने, विलास गावंडे, उत्तमराव भेंडे, अतुल वानखडे, पंजाबराव जगताप, विष्णू गावंडे, बंडू कुळसंगे, रवी भोंगाडे, सुभाष मिरासे, प्रमोद जगताप, रितेश राऊत, कैलास देशमुख, संतोष बोटरे आदींसह शेकडो धरण विरोधी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.यावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता पवार, मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख, तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे प्रशासनासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असल्याचे धरण विरोधी संघर्ष समिती कडून कळाले.


