दोन वर्षांपासून गावातील नागरिकांना पाणीच मिळाले नाही,
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान : महागांव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या डोंगराळ भागातील वाकान येथे जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून अतीशय संत व कासव गतीने सुरू असुन येथील नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.प्रत्येक गावागावात वाडी, वस्तीत नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळावे व हर घर जल असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.मात्र या कोट्यवधी रुपयांच्या कामात दिरंगाई व भ्रष्टाचार होत असुन फार मोठ्या प्रमाणावर कामात अनियमितता होत असुन येथील गावातील नागरिकांना स्वछ पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.मात्र या विषयाकडे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी फीरकुनही पाहत नसल्याने कंत्राटदारास उलट खत पाणी घालून पाठीसी घालत असल्याची चर्चा गावातील नागरिकांमधून होत आहे.सबंधीत पाणी पुरवठा अधिकारी,व कंत्राटदार यांच्या मिलीभगतीमुळे व यांच्या मधुर संबंधांमुळे सदर कामात दिरंगाई होत असुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.सदर कामाची मर्यादा शासनाने कीमान १५ महिन्यापर्यंत ठेवली आहे मात्र दोन ते अडीच वर्ष निघून गेले परंतु वाकान येथील जलजीवन मिशनचे काम प्रगतीपथावर पोहचलेच नाही हे केवळ पाणी पुरवठा अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कुंभकर्णाच्या निद्रेत असलेल्या कंत्राटदारावर मात्र कोणतेच परीणाम होत नसल्याची ओरड येथील नागरिकांमधून होत आहे गावातुन जागोजागी पाईप लाईन टाकन्यात आली मात्र टाकलेल्या पाईपलाईनीचे खडे व फोडलेले रस्ते नित्कृष्ट दर्जाचे व धातुर मातुर पध्दतीने तयार करण्यात आले.जलजीवन मिशनच्या कामांसाठी लागणारे साहित्य,रेती,गीटी, सिमेंट, लोखंडी साहित्य,पान्याची टाकी यासह सर्व साहित्य नित्कृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याची बोलल्या जात आहे.त्यामुळे येथील जलजीवन मिशनचे काम भ्रष्टाचाराच्या विळख्यात संत व कासव गतीने सुरू आहे.त्यामुळे येथील नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.तालुक्यात ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम सूरू आहे तसेच काम अपुर्ण व पुर्ण झालेल्या जलजीवन मिशनच्या कामाबद्दल पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून जाणून घेणे अपेक्षित आहे मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी सदर कामाकडे फिरकुन सुध्दा पाहत नाही ही एक शोकांकिता आहे या जलजीवन मिशनच्या कामात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांनी मीलीभगत करून अंदाजपत्रकानुसार कामे न करता अंदाज पत्रकाला तिलांजली देत कामांवर मोज माफ पुस्तीकेत जास्त कामे दाखवून जास्त रक्कम कंत्राटदारांना अदा करण्यात आल्याचे येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे.या सर्व कामांची उच्च स्तरावरून चौकशी व्हावी व जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ यांनी या कामाविषयी तात्काळ लक्ष केंद्रित करून चौकशी समिती नेमण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करुन वाकान येथील गावकऱ्यांना तातडीने स्वच्छ पिण्याचे पाण्याची सोय सुविधा उपलब्ध करून हर घर जल हे उद्दीष्ट पुर्णत्वास न्यावे अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.


