गौतम देवतळे
ग्रामीण प्रतिनिधी आर्णी
सावळी सदोबा सर्कल मध्ये असलेल्या वरूड तु गावात मारोती बावणे यांच्या घराला आग लागुन नुकसान झाले आहे.सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही पण घरातल्या सामानाची नुकसान झाले आहे.या घरांतील फ्रिज,वाटर फिल्टर आणि अन्नधान्य कपडे असे बरेच प्रमाणात घरात असलेल्या. वस्तुची हानी झाली.घर मालक दुकानदार आहे.तेव्हा गावांतील लोकांच्या सतर्कता आणी तत्परतेने वेळैवर धावपळ सुरू करुन मोठी हाणी होण्या आधीच आगीवर नियंत्रण केले.आगीची बातमी कळताच पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.मा.तहसीलदार साहेब आर्णी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.विषेश म्हणजे आग लागली ते घर गावाच्या मध्यभागी आहे.


