गोपाळकुमार कळसकर तालुका प्रतिनिधी, भुसावळ.
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथिल सार्वजनिक बौद्ध विहारात दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात फॅक्टरी चे महाप्रबंधक अरुण ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. जयंती चे आकर्षण ठरले वरणगाव फॅक्टरी चे महाप्रबंधक अरुण ठाकूर यांचे प्रेरणादायी भाषण. त्यांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून तर प्रेरणादायी संघर्षाचा इतिहास उपस्थित जनसमुदायास सांगितला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आठवडाभर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्पर्धेत विजयी स्पर्धकांना महाप्रबंधक अरुण ठाकूर साहेब, रविकांत सपकाळे, विसपुते, संदिप सपकाळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ससाणे तर आभार प्रविण मोरे यांनी केले. महत्वपूर्ण बाब म्हणजे बहुजन समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी, युनियन असोसिएशन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


