तुकाराम पांचाळ
तालुका प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद दि. १८ एप्रिल करखेली ते धर्माबाद रस्त्यावर गावाच्या अंदाजे ५००मीटर अंतरावर कॅनाल कालव्याच्या दोन पुलाचे काम चालू असल्याने दोन्हीही पुलाजवळ काम चालू असलेले सुरक्षा सूचना फलक न लावल्यामुळे वेगवेगळे सतत दोन दिवस दोन भीषण अपघात झाले ह्या अपघाता मध्ये एक गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे तर दुसऱ्या दिवशीच्या अपघातामध्ये एकास जीव गमवावा लागला ही भयावय अवस्था आज त्या रस्त्यावर घडत आहे पण संबंधित गुत्तेदार हे ना तिथे काम पूर्ण करण्यास तयार नाही ना तिथे कोणतेही सुरक्षेचे उपाय व सुरक्षा फलक लावण्यास तयार नाही एका गुत्तेदार यांच्या निष्काळजी पणामुळे हा प्रकार घडला आहे पहिला अपघात संतोष तुळशीराम दामनवाड वय २६ वर्ष हा दिनांक १२ एप्रिल रोजी अंदाजे रात्री ७ ते ८ वाजता च्या दरम्यान करखेली हून जवळा ह्या गावी जात असताना रस्त्यातच कॅनॉल च्या पुलाचे काम चालू आहे हे न दिसल्यामुळे दुचाकीस्वार अचानक पुलावर धडकला व गंभीर रित्या जखमी झाला पुलाच्या दोन्ही बाजूने डांबरी रस्ता असल्यामुळे त्याला माहीत नव्हते त्या पुलाचे बांधकाम चालू आहे ते व ते अचानक पुलावर धडकल्यामुळे तो फार गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला निजामाबाद येथील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आणि त्याला आज पर्यंत होश आलेला नाही तो मृत्यूशी झुंज देत आहे आणि दुसऱ्या दिवशी अपघात झालेला व्यक्ती तर अक्षरशा घटना स्थळी मृत्युमुखी पडला ह्या घटनेस त्या कामाचे गुत्तेदार जबाबदार आहेत कारण दोन्ही बाजूने डांबरीकरण झालेला एकदम नवा रस्ता आहे त्या मुळे तेथे सुरक्षा फलक किंवा लाल झेंडी लावण्याचे काम त्या गुत्तेदारांचे होते पण त्यांच्या हलगर्जी पणामुळे ऐकला प्राण गमवावा लागला ह्या अशा हलगर्जीपणाने काम करणाऱ्या गुत्तेदारास कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अपघात झालेल्यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे असे वक्तव्य व संताप जनतेतून व्यक्त होत आहे


