वैभव ठाकरे
शहर प्रतिनिधि अमरावती
अलिकडेच, श्री राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर, भगवान श्री रामचंद्रजींचे उत्कट भक्त श्री संत गजानन महाराज यांच्या स्थानिक मंदिरातून राजनंदिनी स्मृती फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे “निर्माल्य संकलन मोहिमेचे” शुभारंभ केल्या गेले. भक्त मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने मंदिरातील देवतांना हार, फुले इत्यादी अर्पण करतात. त्यानंतर त्याची नद्या, विहिरी किंवा तलावांमध्ये विल्हेवाट लावल्या जाते
निर्माल्य संकलन मोहीम पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाची आहे कारण ही मोहीम मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर अर्पण केलेली फुले व इतर साहित्य गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी चालवली जात आहे. या मोहिमेचे पर्यावरणीय फायदे देखील आहेत, जसे की जलप्रदूषण रोखणे, कारण मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर अर्पण केलेली फुले आणि इतर साहित्य अनेकदा नद्या आणि जलस्रोतांमध्ये फेकले जाते, ज्यामुळे जलप्रदूषण होते. निर्माल्य संकलन मोहिमेमुळे हा प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल.
कचरा व्यवस्थापन- निर्माल्य संकलन मोहिमेद्वारे गोळा केलेली फुले व इतर साहित्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाऊ शकते, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनातही सुधारणा होऊन प्रशासनाला काहीसा दिलासा मिळेल.
जैवविविधतेचे संवर्धन- निर्माल्य संकलन मोहिमेद्वारे संकलित केलेली फुले आणि इतर साहित्य कंपोस्ट किंवा इतर उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते, ज्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होते.
निर्माल्य संकलन मोहिमेचे अनेक सामाजिक फायदे आहेत जसे की जनजागृती करणे, निर्माल्य संकलन मोहिमेद्वारे लोकांना पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूक केले जाऊ शकते.
सामुदायिक सहभाग- निर्माल्य संकलन मोहिमेत सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सहकार्याची भावना मजबूत होईल.
अशा प्रकारे, निर्माल्य संकलन मोहीम धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे कारण या मोहिमेचा उद्देश जलप्रदूषण रोखणे आहे.
अशा प्रकारे निर्माल्य संकलन अभियान धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे कारण या अभियानामुळे जलप्रदूषण, कचरा व्यवस्थापन, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरितगृह वायू कमी होण्यास मदत होते. वरील विचार पर्यावरण मित्र आणि आकाशवाणी कलाकार कु.क्षमता ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
सर्व मंदिरे व धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांनी पर्यावरनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजनंदिनी स्मृती फाउंडेशनशी ९३७०१०१५७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्षमता द्वारा संकल्पित मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणेशा या महामोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा व विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याचे काम दिनांक १ जानेवारीपासून अविरतपणे सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत २५ हजार विद्यार्थी आणि २ हजार जागरूक नागरिकांचा गौरव करण्यात आला आहे.


