स्वरूप गिरमकर
तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुका मित्रपरिवार पुणे व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील चंदननगर मध्ये मोफत 97 वा मराठा वधू वर परिचय मेळावा मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता चंदननगर येथील जुन्या भाजी मंडईत मनपा शाळेच्या हॉलमध्ये होणार आहे. तसेच पुढील ९८ वा मोफत मेळावा हा आळंदी शहरातील ज्ञानसागर मंगल कार्यालयामध्ये रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती शिरूर तालुका मित्र परिवाराचे अध्यक्ष बाळा पऱ्हाड व संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांनी दिली आहे. हे सर्व मेळावे मोफत असून वधू-वरांनी आपल्या पालकांसोबत आधार कार्ड झेरॉक्स व बायोडाटा घेऊन येणे बंधनकारक आहे. पदवीधर, उच्चशिक्षित,अविवाहित,घटस्फोटीत, विधुर, विधवा यांच्यासाठी हा मेळावा आहे.मेळाव्यामध्ये विविध भागातील अनेक चांगली सुंदर स्थळे समक्ष बघायला मिळणार आहेत. आतापर्यंत संस्थेमार्फत 4500 लग्न जमले आहेत त्यातील 550 लग्न हे एकल विधुर विधवा यांची जमली आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7020281282 यावर करण्याचे आवाहन केले आहे.संस्थेची अहिल्यानगर, पुणे, नाशिक या तीन ठिकाणी शाखा आहेत.


