सरफराज खान पठाण
शहर प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : १९३ देशात साजरा होनारा जगातील सर्वात मोठा ऊत्सव ” भिमोत्सव ” १४ एप्रिल ला मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करन्यात आला . या दिवशी जमीनीवर सर्वत्र निळा महासागर निळ्या आकाशासोबत स्पर्धा करतांना पहायला मिळाला.भद्रावती येथेही नविन बस स्थानक व जुने बस स्थानक परिसर निळे झेंडे,निळ्या पताका, स्वागत कमानी व निळ्या बॅनर्सनी फुलुन दिसत होता.महामानवांचे योगदान व त्यांच्या कार्याचे स्मरण करुन असंख्य अनुयायांनी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीची मानवंदना दिली.नविन बस स्थानक येथे ऑटोरिक्शा असोसिएशन भद्रावती तर्फे भोजनदान कार्यक्रम ठेवन्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटक मागासवर्ग आयोग अध्यक्ष माननीय हंसराजजी अहिर, प्रमुख पाहुणे मान.आमदार करण देवतळे , पोलीस निरीक्षक लता वाढीवे मॅडम,माजी नगराध्यक्ष मा. अनिलभाऊ धानोरकर, सुनीलजी नामोजवार, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस अमितजी गुंडावार, मा.ॲड.भुपेंद्रजी रायपुरे, माजी नगरसेवक प्रफुलजी चटकी,राजुजी सारंगधर,सुशिलजी देवगडे, जयंती समारोह अध्यक्ष श्री विजय गायकवाड ई.मान्यवर मंचावर ऊपस्थित होते.जयंती कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला दीप प्रज्वलित करुन व पुष्पहार अर्पित करुन करन्यात आली.कार्यक्रम स्थळी आलेल्या संपूर्ण मान्यवरांचे ऑटोरिक्षा असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करन्यात आला.हंसराजभैया अहिर यांचे हस्ते नगर परिषद ने उभारलेल्या प्रवासी निवारा छत्राचे लोकार्पण करन्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी बाबासाहेबांचे योगदान, त्यांच्या कार्यांचे स्मरण व संघर्ष कथन करुन त्यांना मानवंदना दीली. सुत्र संचालन मिलींदभाऊ शेंडे तर ऑटोरिक्षा असोसिएशन चे अध्यक्ष बाळुभाऊ उपलंचीवार यांनी आभार प्रकट केले.मान्यवरांच्या हस्ते भोजनदानाची सुरुवात करुन देन्यात आली.शिस्तबद्ध पद्धतिने नागरिकांनी भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.अशाचप्रकारे ऑटो रिक्षा असोशिएशन भद्रावती नेहमी सर्वधर्मीय कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आणि उत्साहाने पार पाडीत असते.कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी उपाध्यक्ष सनमोहन केशवन, सचिव यशस्वी सहारे,सहसचिव राजु बालप्पा, कोषाध्यक्ष प्रकाश मेंढे, कार्यकारिणी सदस्य: शशि कवाडे, संजय शेंडे, रमेश पाटील, राहुल रामटेके, गणेश गजलेकर,अझहर शेख, बबलू पठाण.सदस्य: फिरोज अली,विजु तिडके, संदीप तावाडे,विजु काकडे, गणेश पेटकर, विनोद कुमरे आणि ईतर सर्व ऑटो चालक सदस्यांनी परिश्रम घेतले.


