नरेंद्र राऊत
तालुका प्रतिनिधी आर्णी
आर्णी तालुक्यातील राणीधानोरा येथे १४एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते अँ.प्रदिप वानखेडे यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी परीसरातील बौद्ध बांधवांची तथा गावांतील सरपंच, उपसरपंच आणि इतर समाजातील सर्व स्तरातील लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.या प्रसंगी ॲड.प्रदिप वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.बाबासाहेब यांच्या विचारांचे आजच्या काळात किती आवश्यकता आहे म्हणुन आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा प्रसार व अनूसरण करावेत असे आवाहन त्यांनी केले.तसे च राणिधानोरा येथे एक सामाजिक भवन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले डॉ.बाबासाहेब यांचे पुर्णाकृती पूतळा उभारण्या करिता अरुण देवतळे माजी सरपंच रानीधानोरा त्यांच्या सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.


