नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोरडी येथील आशा गटप्रवर्तक या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती सुलोचना सुभाषराव भंडारे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालीका अंतर्गत खुल्या प्रवर्गातून सहाय्यकारी परिचारीका ( प्रसाविका ) या पदावर एस.व्ही. रोड आरोग्य केंद्र एच पश्चिम विभाग येथे आजपासून १८ ०७. २०२४ रोजी पासून एस १५ या वेतनश्रेणी मध्ये नियुक्ती झाल्याबदल श्रीमती सुलोचना भंडारे यांचे हिमायतनगर तालुक्याचे तालुक आरोग्य अधिकारी डॉ. संदेश प्रभाकरराव पोहरे प्राथमीक आरोग्य केंद्र चिचोर्डी येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ जर्नादन टारपे, तालुका समुह संघटक श्री चौधरी कृष्णा पांडुरंग , आरोग्य सहाय्यक श्री राजीव नागमवाड , श्री सचिन देशमुख, श्री अफरोज सौदागर, श्री सुनिल चव्हाण व गटप्रवर्तक पोर्णिमा कांबळे व सर्व आरोग्य कर्मचारी व आशा ताई यांनी सुलोचना भंडारे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.