प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
हातकणंगले : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला’……असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेठ वडगांव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी शाळेच्या आवारात ग्रंथ दिंडी, रिंगण व किर्तन सोहळा पार पडला. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे गुरुवारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई, वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत विठ्ठलाचे अभंग म्हणत शाळेच्या परिसरात ग्रंथ दिंडी काढली होती तर शाळेच्या मैदानात गोल रिंगण सोहळा अनुभवला यानंतर कीर्तनकार ह.भ.प.भागवत शिंदे महाराजांचे कीर्तन ही या निमित्ताने ठेवण्यात आले होते. शाळेचा सर्व परिसर भक्तीमय झाला होता. यामध्ये प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर, शिक्षक संतोष पाटील, सुधीर माने यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


