तुकाराम पांचाळ करखेलिकर ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
हातनी ता. उमरी बळेगाव येथील कृष्णामाई विद्यामंदिर येथे शिक्षनासाठी दररोज शाळेत जाणारी मुले,नेहमी प्रमाणे शाळेत जात असताना.शाळेजवळ शाळा काही अंतरावरच असताना हा आपघात झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट उसाची शेती असल्याने अचानक पणे हरिण रिक्षा खाली आले आणि दुदैवाने अपघात घडला.हरिण तर सुखरूप बचावले मात्र त्या बदल्यात एका लहान गणेश गोविंद निलेवार या निष्पाप लेकराला मात्र जीव गमवावा लागला आणि रिक्षा तील एका विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे व इतर अन्य विद्यार्थी सुद्धा जखमी झाले त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले ह्या बालकाच्या निधनाने पुर्ण गावावर शोककळा पसरली आणि संपूर्ण गाव हे दुःखाच्या डोंगरात बुडाला आहे.