मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :आज दि. १९ ॲागस्ट २०२४ ला चांदूर रेल्वे येथील भारतीय कम्युमनिस्ट पक्षाच्या कार्यालय आणि बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा कुदळ मारून प्रारंभ जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी नगराध्यक्ष कॅाम्रेड मुलायमचंद जैन आणि जेष्ठ कॅाम्रेड श्रीमती कमलताई ब्रित्रे यांनी केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल मेंबर कॅाम्रेड तुकारामाजी भस्मे, भाकप जिल्हा सचिव सुनिल मेटकर, प्रगतिशील लेखक संघाचे प्रा. प्रसेनजीत तेलंग, किसान सभेचे कॅा. अशोक सोनारकर, आप चे विदर्भ नेते, माजी नगरपालिका उपाध्यक्ष नितीन गवळी, माकपचे कॅा.देविदास राऊत, राकापचे( शरद पवार)चे अमोल दुधाट हे उपस्थित होते. याप्रसंगी भाकप( चांदूर रेल्वे) सचिव कॅा. सतीश चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात, आजच्या अंधार युगात डाव्या चळवळीची भूमिका आणि अशा सभागृहांचे महत्व विषद केले. प्रलेसंचे प्रा. प्रसेनजीत तेलंग यांनी वर्तमान काळात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची किती आवश्यकता आहे, आणि हे सर्व पुरोगामी चळवळींसाठी प्रबोधनाचे केंद्र बणविण्याचा कसा प्रयत्न केला जाईल याची रूपरेखा मांडली. यावेळी प्रा. तेलंग यांनी या कार्यक्रमासाठी मा.साजीदभाई जाणवाणी, मा. सचिन चंदाराणा, मा. हर्षल वाघ मा. पारस रॉय यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाचा उल्लेख केला. माजी आमदार प्रा. वीरेन्द्रभाऊ जगताप यांनी या कार्यारंभास शुभेच्छा देतांना हे सर्व लोकशाहीवादी लोकांसाठी आदराचे केंद्र बनावे अशी अपेक्षा व्यक्त कोली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना कॅा. तुकाराम भस्मे यांनी, आमचा प्रयत्न देश वाचविणे आहे. क्रोनी कॅपिटलिझमने साऱ्या देशालाच नागवे करण्याचा कसा चंग बांधला आहे याची चर्चा करून आजच्या घडीला इंडिया आघाडीला एकदिलाने साथ देणे हाच संविधान विरोधी धर्मांध शक्तिंना थांबविण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मा. नितीन गवळी, कॅा.देविदास राऊत आणि स्वप्नील दुधाट यांनी बांधकामाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे संचालन कॅा. सागर दुर्योधन तर आभार प्रदर्शन कॅा. विनोद जोशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कॅा. जयप्रकाश चोरडिया, कॅा. शेखर बद्रे, किशोर काळे राजू राऊत चव्हाण सर दिलीप राऊत कॅा. बभुतकर सर, कॅा. भूषण नाचवणकर,किशोर कदम कॅा. श्रीकांत चौधरी, आणि इंडिया आघाडीतील आणि सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


