मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात उपोषणनाचे मंडप चौथ्या दिवशी प्रणवचे उपोषण सोडविले प्रशासनाने तरी आरतीचे उपोषण सुरूच वारसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी 15 आॅगस्ट पासून आरती इमले ने नगर परिषद समोर उपोषणाला सुरुवात करत आज तब्बल 8 दिवस पुर्ण झाली असून दुसरीकडे घरासमोरील चिकन मटन विक्रेत्यांना हटविण्याकरीता प्रणव चवरे हा युवक 19 आॅगस्ट पासून उपोषणाला बसला असून नगर परिषद प्रशासन मात्र कुठलाच तोडगा काढण्यासाठी तयार नाही अश्यात राखी सारख्या सणाला शहरवासीयाची बहिन तर दुसरीकडे प्रणव हा उपाशी बसला तर नप अधिकारी व कर्मचारी मात्र तुपाशी असल्याची चर्चा शहर करीत आहे अश्यात चौथ्या दिवशी प्रणव यांचे उपोषण मुख्याधिकारी यांनी सोडविले चांदूर रेल्वे नप मध्ये वरसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी 15 आॅगस्ट पासून आरती इमले ने नगर परिषद समोर उपोषणाला सुरुवात करत आज तब्बल 8 दिवस पुर्ण झाली तरी प्रशासनाने या विषयावर चर्चा करून कुठलाच तोडगा काढला नाही म्हणून 19 आॅगस्ट रक्षाबंधनाचा पवित्र दिवशी एक महिला वारस हक्काने नोकरी मिळावी म्हणून उपाशी उपोषण मंडपात बसली अश्यात सतत सुट्टी असल्याने प्रशासकीय अधिकारी यांनी या उपोषण मंडपाकडे पाठ फिरवली तर आज आठ दिवस पूर्ण होऊनही अधिकारी व लोकप्रतिनिधी येऊन पाहत नाही म्हणजेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठलीच भीती वाटत नाही अश्यात शहरात एकामागोमाग उपोषण मंडप पडत असून प्रशासन मात्र मूख दर्शकाची भूमिका घेत असून समस्यांचे निराकरण न करता वेळ मारत राखी सारख्या सणाला गावातील बहिन उपाशी राहत असून अधिकारी व कर्मचारी तुपाशी असल्याची चर्चा सर्व सामान्य नागरिक सध्या तरी शहरात करत आहे.तर दूसरीकडे चिकन मटन विक्रेताना शहरातील मध्य ठिकाणी असलेले व्यवसाय हटविण्याकरीता प्रणव साहेबराव चवरे हा युव मागील 4 महिन्यापासून नगर परिषद प्रशासनाला घरासमोरील चिकन मटन चे दुकान हटवण्यासाठी निवेदन देत असल्यावर ही नगर परिषद मुख्याधिकारी कुठलीही ठोस भूमिका घेत नाही म्हणून प्रणव चवरे ने शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबला असून त्याने ही 19 आॅगस्ट पासून उपोषणाला सुरुवात केली असून मागील 4 दिवसापासून उपोषण सुरू आहे,प्रणव चवरे यांचे घर अमरावती रोडवर असून त्यांच्या घरा समोर मटनचिकन चे दुकान असल्याने नेहमी अस्वच्छता व दुर्गंधी येते चिकन मटन विक्रेत्यांच्या घाणीमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिकांनीही सदर दुकाने इतर ठिकाणी हलविण्यात यावे म्हणून निवेदन दिले तरी मुख्याधिकारी मात्र तोडगा काढत नसून उपोषण मंडपाला भेट देत कारवाई सुरू आहे या करीता वेळ लागेल आपण उपोषण मागे घ्यावे अशी चर्चा करीत असल्याचा आरोप प्रणव करीत आहे सदर दुकाने नियम बाह्य असल्यावर ही नप हटवत नसून त्यांना शह देत शहरातील नागरिकांच्या जीवनाशी खेळत असल्याचे एकदरी चित्र आज शहरात दिसत आहे.अश्या लहान व शुल्क कारणासाठी प्रशासनातील अधिकारी उपोषण करण्यासाठी भाग पाडत असेल तर खरीच यांना गावातील नागरिकांचे हित,आरोग्य,समस्याचे समाधान करायचे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.# चौथ्या दिवशी प्रणवचे उपोषण सोडविले प्रशासनाने अमरावती रोडवरील क्रांती चौकाती प्रणव चवरे यांच्या घरासमोरील चिकन मटन विक्रेत्यांना हटविण्याकरीता मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू असताना मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देत 15 दिवसांत योग्य कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रणव चवरे यांनी मुख्याधिकारी यांच्या हाताने ज्यूस घेत उपोषण सोडविले यावेळी मुख्याधिकारी डॉ विकास खंडारे,जितू कर्से,आशिष खुरटकर,पल्लवी जाभोळकार,राजेश शिर्के, समाजसेवक हर्षल वाघ,हरीभाऊ गवई,सुमेद सरदार,प्रकाश चवरे,राष्ट्रपाल मेश्राम,चंदू ऊके,रूटचंद्र चवरे,पत्रकार अभिजित तिवारी,राजेश सराफी,प्रकाश रंगारी व शहरातील इतर नागरी उपस्थित होते.


