गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट : माहूर विधानसभा क्षेत्रात सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस प्रत्येक गावा गावात ग्रामीण भागात शहरी भागात माजी आमदार प्रदीप नाईकाकडून गावोगाव पोहोचण्याचे काम चालू असताना दिनांक वीस रोजी राष्ट्रवादी नेत्यात एक आगळी वेगळी झलक पाहायला मिळाली किनवट माहूर विधानसभेचे विद्यमान आमदार इस्लापूर येथील लोकार्पण सोहळा शुभारंभ प्रसंगी आले असता शासकीय विश्रामगृह इस्लापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण तडफदार युवा नेते निर्गुण पाटील जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक व कला मंच नांदेड यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी केराम यांची शासकीय विश्रामगृह इस्लापूर येथे निर्गुण पाटील यांनी बंद खोलीत दरवाजा आड भेट घेऊन यांच्यात राजकीय हितगुज विशेष चर्चा झाल्याची माहिती विश्वासू सूत्रांकडून मिळाल्याची चर्चा सध्या तरी या भागात गुंजत आहे निर्गुण पाटील हे भाजपा मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदीप नाईक यांच्या युवा कार्यकर्त्याची तारांबळ होताना दिसून येत आहे. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्गुण पाटील कोणते पाऊल उचलतील अशी चर्चा राष्ट्रवादीचे नेत्यांमध्ये होताना दिसून येत आहे विद्यमान आमदार भीमरावजी केराम व राष्ट्रवादीचे सांस्कृतिक व कला मंच जिल्हाध्यक्ष यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे तरी अद्यापही कुणाला समजल्याचे कळेनासे झाले किनवट व माहूर विधानसभा क्षेत्रात खरच राजकीय भूकंप होईल का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची हार होईल का अशी सध्या तरी जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे निर्गुण पाटील हे विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्यासोबत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात काम करतील का अशी ही युवकामध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा सध्या रंगताना दिसून येत आहे.


