बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड ॲण्ड कॉमर्स (एम सी टीसी ) ची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे 19 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या बैठकीत संघटनेच्या उपाध्यक्षपदी धडाडीचे कळमनुरी मतदारसंघाचे माजी आमदार गजानन घुगे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मराठवाड्यातील व्यापारी प्रतिनिधींची उपस्थिती होती. बैठकीस हिंगोली व्यापारी मतदासंघाच्या कार्याची दखल घेऊन माजी आमदार गजानन घुगे यांची निवड करण्यात आली. निवडी बद्दल नुतन अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबड़ा , मानसिंग पवार, सत्यनारायण लाहोटी, प्रफुल्ल मालाणी , हिंगोली व्यापारी महासंघ तसेच कळमनुरी मतदासंघ व हिंगोली मतदासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.