शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
विज्ञान मेळाव्यासाठी विभागीय स्तरावर निवड.सेलू : दि. 20 ऑगस्ट श्रीराम प्रतिष्ठान संच लित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. तनिष्का अनंत तेलभरे वर्ग 9 वी हिने अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमां क मिळवला.अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी परभणी जिल्ह्यातून सर्व तालुक्यातील निवड झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या अखिल भारतीय विज्ञा न मेळाव्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सुरुवातीला विद्यार्थ्यां ची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांचे भाष ण कौशल्य,पावर पॉइंट प्रेझेंटेशन व परीक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले ल्या प्रश्नाच्या आधारे विभागीय विज्ञान मेळा व्यासाठी परभणी जि ल्ह्यातून दोन विद्यार्थ्यां ची निवड झाली आहे. तरी कुमारी तनिष्का अनंत तेलभरे या विद्या र्थिनीने सर्व कसोट्या वर उत्तम मार्क्स मिळ वून अप्रतिम प्रदर्शन केले व सर्वांची मने जिंकली.आता विभा गीय स्तरावर निवड झाली आहे.जिल्हास्त रीय विज्ञान मेळाव्या साठी विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांनी मार्गदर्शन केले.या यशा साठी श्रीराम प्रतिष्ठान सेलू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोड गे, सचिव डॉ सविता रोडगे,प्रशासकीय अधि कारी प्रा महादेव साब ळे, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसा गर, शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.