विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: उमरखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत जन्म नोंद मिळविण्यासाठी नागरिक उमरखेड तालुक्यातून नव्हे तर हिंगोली पुसद यवतमाळ नांदेड किनवट अशा ठिकाणाहून येत आहेत पण येथील कर्मचारी जेवणाच्या नावाखाली तीन साडेतीन पर्यंत नागरिकांना ताटकळत ठेवत आहेत. अनेक नागरिकांना सर्वर डाऊन आहे नेटवर्क नाही असे कारण देऊन वापस पाठवले जात आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे काही कर्मचारी आत मध्ये काम करत असून बाहेर त्यांचा एक कर्मचारी ऑफिसला कुलूप लावून बाहेर थांबलेला आहे आणि इतरांना सांगतो साहेब बाहेर गेलेले आहेत नेटवरचे प्रॉब्लेम सांगत आहे पण साहेब बाहेर फिरत आहे नागरिकांना खूप मोठा सहन करावा लागत आहे तरीही नगरपरिषद प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या.