सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
रोटरी क्लब दोंडाईचा द्वारा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा मानाचा सन्मान यंदा (उमराणी बुद्रुक) येथील डॉ. सुनील पावरा यांना प्रदान करण्यात आला. नुकत्याच दोंडाईचा येथे झालेल्या एका शानदार समारंभात सदर सन्मान सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीशी झुंज देत डॉ सुनील पावरा यांनी प्रथम एम.बी.बी.एस पुर्ण करीत वर्धा येथुन आदिवासी पावरा समाजातील पहिले आर्थोपेटिक सर्जन होण्याचा मान संपादन केला व अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून नावारुपास यायला लागले नंतर दिल्ली येथील मॅक्स हॉस्पिटल येथून त्यांनी जाईन रिफ्लेसमेंट कोर्स पूर्ण केला. रिफ्लेसमेंटमधील जिल्ह्यातील ते पहले सर्जल आहे. अशिक्षित आई वडील आपली ही मुले डॉक्टर व्हावीत हे त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्या स्वप्नाला साक्षात उतरवण्यासाठी डॉ. सुनील पावरा यांनी घेतलेले कठोर परिश्रम त्यापासून प्रोत्साहन घेत धाकटे भाऊ डॉ विलास पावरा व डॉ. कल्पेश पावरा हे दोघे भाऊ आज डॉक्टर झाले आहेत धडगांव सारख्या दुर्गम भागातील उमराणी छोट्या गावातून डॉ. सुनील पावरा जिल्ह्याचे पहिले जैन रिप्लेसमेंट सर्जल आहेत जैन रिप्लेसमेंट सारखे सुपर स्पेशलिस्ट सेवा नंदुरबार सारख्या जिल्ह्यात अतिशय कमी खर्चात देत आहे कठीण परिस्थितीशी सामना करीत सातपुडा परिसरातून निघून येथेच ते आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत आहेत त्यामुळे ते एक प्रकारे समाजाशी आणि जिल्ह्याचे नाव मोठे करीत आहे त्यांच्या याच कार्याशी दखल घेत रोटरी क्लब दोंडाईचा द्वारा त्यांना हा सन्मान प्रदान केला रोटरी क्लबने यांना दिलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की दोन व्यक्ती अशी असतात यांच्यासमोर आपण आपले सर्वात खोल दुःख मांडू शकतो एक आई एक डॉक्टर जेव्हा एखादी व्यक्ती आपली व्यथा डॉक्टरांना सांगते तेव्हा त्यांच्या मनाला आराम मिळतो आणि त्यावर उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा होतो आजारपणात जेव्हा मानसिक अवस्था शिंगेला पोहोचते तेव्हा डॉक्टरांनी दिलेला पाठिंबा आणि आश्वासन अमूल्य असते तुमची अपवादात्मक कौशल्ये आणि सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन या दोन्ही आवश्यकता गरज पूर्ण करतात तुमचे अथक प्रयत्न बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक संपूर्णाने तुम्ही समाजावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे तुमच्या योगदानाने केवळ तुमचा आणि तुमच्या कुटुंबांचाच नव्हे तर तुमचा समुदाय, शहर, राज्य आणि आपल्या महान भारत देशाचा मान उंचावला आहे असे गौरवोद्गार गार क्लबने डॉ. सुनील पावरा यांच्या बद्दल काढले आहेत त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा…