तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचित केले की सरकारची महत्वाकांक्षी योजना – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ही योजना जिल्ह्यात जलदगतीने महिलांपर्यंत कशी पोचेल यासाठी गतिशील आणि पारदर्शी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दूर दृष्टी प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित केली असता ते बोलत होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, याच्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका, महानगरपालिका कार्यालयामार्फत जिल्ह्य़ातील मुख्य मार्गावर या योजनेचा माहितीसाठी सुचनात्मक फलक , बॅनर किंवा होल्डिंग लावण्यात यावेत.त्यामध्ये योजनांची माहिती कसे कुठे फार्म भरावेत, कोणत्या पात्र महिलांनी भरावे, किती तारखेपर्यंत भरावे असे स्पष्ट लिखित असले पाहिजेत. जिल्ह्यातील पात्र महिला या योजनेपासून वंचित राहूनये याच्यासाठी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका चे वरिष्ठ अधिकारी,नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी , पंचायतसमिती चे गटविकास अधिकारी, यांना या योजनेच्या कार्यान्वित करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या वतीने निर्देशित केले गेले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, महिला समाजसेवी कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून गावा -गावात जाऊन जनजागृती व प्रचार – प्रसार केला गेला पाहिजे. असा आदेश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजय जाधवर, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, प्रांताधिकारी श्री आगे पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे, जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार आदी जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











