मनोज भगत, ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तेल्हारा आगार व सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची परिवहन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेअंतर्गत पासेस वाटप समारोह पार पाडला. या समारोहाच्या अध्यक्षतेत महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे तेल्हारा आगार प्रमुख मिथुन शर्मा वैभव ठाकरे सुप्रिया इंगळे प्राचार्य संतोषकुमार राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोंचे पूजन व हारर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. तसेच अमरावती विभागीय विभागीय स्पर्धेत तेल्हारा आगाराने तिसरा क्रमांक पटकावल्या बद्दल व प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये आगार व्यवस्थापक यांच्या पुढाकाराने मोफत पासेस उपलब्ध होत असल्याने आगार व्यवस्थापक मिथुन शर्मा यांचा संस्थेच्या वतीने श्यामशिल भोपळे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थिनींना पासेसचे वाटप करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय श्यामशिल भोपळे यांनी तेल्हारा आगाराचे मोफत पासेस विद्यार्थ्यांना शाळेतच उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचून तो वेळ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामासाठी दयावा, असे आवाहन करीत आगाराचे आभार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसोबतच शासकीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यास संस्था सदैव कठीबंध असते असे सांगितले.तसेच आगार व्यवस्थापक शर्मा यांनी सुद्धा परिवहन मंडळाच्या सोयी सुविधेच्या विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या समारोहाचे संचलन पर्यवेक्षक गणेश खानझोडे तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश गिऱ्हे यांनी केले.या समारोहाच्या यशस्वीते करीता प्रा. दुर्गाताई बोपले, प्रा.अमोल दामधर, प्रा.गजानन खारोडे,प्रा.उमेश इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.


