माजी ग्रामपंचायत सदस्य कामील अली यांचा स्तुत्य उपक्रम.
मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच संस्थाध्यक्ष मिर ख्वाजा उर्दू वेल्फेअर शिक्षण मंडळ हिवरखेड व माजी शिक्षण व अर्थ सभापती अकोला केंद्रीय फिल्म सेनसल बोर्ड मुंबई सदस्य व अखिल भारतीय कॉंग्रेस सेवादल महा सचिव श्री.शोएब अली मिरसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू विद्यालय येथे विद्यार्थ्यांकरिता मोफत स्कूल बस सेवा सुरू करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळण्याचे साहित्य भेट देण्यात आले.अध्यक्ष श्री शोएब अली मीरसाहेब हे पवित्र हज यात्रे मध्ये गेलेले असल्यामुळे त्यांचे सुपुत्र, संस्था सचिव कामिल अली मिरसाहेब माजी ग्राम पंचायत सदस्य हिवरखेड यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून स्कूल बस सेवा सुरू करण्यात आली. खेळण्याचे विविध साहित्य विध्यार्थ्यांना भेट देण्यात आले. व पुस्तके वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात वसीम बेग मिर्झा माजी सदस्य ग्राम पंचायत नदीम भाई लबरेज दानिश खान ठेकेदार शब्बीर भाई मो. साकीब, अझरउद्दीन अब्दुल दानिश शरीक खान अन्वर अली काशिफ अली मिरसाहेब इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. हज यात्रेला गेलेल्या आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायत माजी सदस्य कामील अली मिरसाहेब त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


