आनंद मनवर तालुका प्रतिनिधी सुधागड
सुधागड : पाली – खोपोली महामार्गांवर पाली ते खुरावले फाटा या दरम्यान रस्त्याचा दोन्ही बाजूला मराठा समाज संस्थेचा वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यकर्माचा शेवट आंबोले येथे श्री गणेश हॉटेल येथे करण्यात आला.पाली, रासलं, वावे, मजरे जांभूळपाडा आणि खुरावले फाटा अशी या पाच गावाचा शेजारी महामार्गांवर झाडें लावण्यात आली. यावेळी आवळा, बेहडा, कडुलिंब, कांचन, शिसवं, कारंज, वावळा इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण मोहिमेत सुधागड तालुक्यातील मराठा समाज बांधवासहित वृक्षप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्तित होते. सदर वृक्षरोपण मोहीम संस्थेचे अध्यक्ष श्री. धंनजय साजेकर यांच्या नेतृत्वा खाली संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, संचालक, विभाग अध्यक्ष, व गडकिल्ले पर्यावरण व वन संवर्धन समितीतिचे पदाधिकारी व मराठा समाज बांधव – भगिनी वृक्षप्रेमी, सुधागड शेतकरी संघटना, तसेच एम. एस. आर. डी. सी. लेगसिटी यांचे विशेष सहकार्य मिळाले त्या मुळे सदर कार्यक्रम यशस्वी पार पडला.सदर या कार्यक्रमाला सर्व झाडे मान. राजेंद्र राऊत साहेब यांनी दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अमित निंबाळकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी पणे अथक मेहनत घेऊन पूर्ण करणारे संघटनेचे संचालक श्री. केतन म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.