समीर शेख ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : अमरापुर ता.शेवगाव येथे दि.05 मे पासुन श्री काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांच्या गजरात सालाबाद प्रमाणे अमरापुर चे ग्रामदैवत श्री काल भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आली. श्री काल भैरवनाथ मंदिरात शनिवार दि.04 मे रोजी जलअभिषेक करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली , मंदिरात काकडा आरती करण्यात आली.मंदिरात भजनाचे आयोजन करण्यात आले आहे .देवाची पालखी (छबीना) ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येतो . तसेच यात्रा कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामधे यात्रेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा नावाजलेला धुमाकूळ ऑरकेस्ट्रा चा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.रात्री गावात छबीना मिरवणुकीनंतर शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे व दुपारी नामांकित पहिलवानांचा कुस्तीचा कार्यक्रम (हगामा)महाराष्ट्र केसरी पै.सईद चाउस यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत अमरापुर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित राहून काल भैरवनाथाचे दर्शन घेतात व होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा व यात्रेचा आनंद घेतात.यात्रेचे संपूर्ण नियोजन अमरापुर च्या लोकनियुक्त सरपंच सौ.आशाताई बाबासाहेब गरड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.