मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/अंबेजोगाई दि: ०४ मे २०२४ बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मंगळवार दिनांक ०७ मे २०२४ रोजी अंबेजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. याकरिता वाहतुकीची कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून नेहमीच्या मार्गात बदल करण्यात आला असून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. वाहन चालक आणि पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतुकीची कोंडी टाळावी असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक सभेकरिता अंबेजोगाई येथे मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते वाहनांसह उपस्थित राहणार आहेत. तसेच जनता ही मोठ्या संख्येने वाहनातून येणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन जनतेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होऊ नये. नागरिकांच्या वाहतुकीच्या वाहनांची गैरसोय होऊ नये. वाहतुकीच्या कोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता अंबेजोगाई शहर व अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून खालील प्रमाणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक वळविण्यात आलेले पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. बीड – केज – लोखंडी सावरगाव टी पॉईंट पाण्याची टाकी यशवंतराव चव्हाण चौक, अंबेजोगाई – परळी या मार्गाची वाहतूक १) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना वाघाळा रोड, बायपास अंबेजोगाई भगवानबाबा चौक – परळी.२) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना सेलू रोड – तथागत चौक – भगवानबाबा चौक – परळी.३) लोखंडी सावरगाव टी पॉईंट वाघाळा साखर कारखाना – पोखरी रोड, तथागत चौक – भगवानबाबा चौक – परळी अशी वळविण्यात आली आहे. परळी – अंबेजोगाई – यशवंतराव चव्हाण चौक – लोखंडी सावरगाव – केज – बीड या मार्गावरील वाहतूक भगवानबाबा चौक – तथागत चौक – पोखरी रोड – वाघळा कारखाना – लोखंडी सावरगाव – केज – बीड या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. लातूर – अंबेजोगाई – परळी या मार्गावरील वाहतूक लातूर – पोखरी तथागत चौक – अंबेजोगाई – भगवानबाबा चौक – अंबेजोगाई अशी वळविण्यात आली आहे. परळी – अंबेजोगाई – लातूर या मार्गावरील वाहतूक भगवानबाबा चौक -अंबेजोगाई – तथागत चौक – पोखरी -लातूर या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. तरी कृषी महाविद्यालय, बीड रोड, अंबेजोगाई येथे सभा मार्गावरील वाहतुक (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, ॲम्बुलन्स, अग्निशामन दलाची वाहने वगळता) ही दिनांक ०७ मे २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजेपासून ते १८:०० सभा संपुन वाहतूक सुरळीत होईपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी सर्व वाहन चालक व मालकांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आदेश बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.