सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जिल्हाप्रशासन तथा पोलिस प्रशासनाकडून विविध निर्बध घालण्यात आले असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते पुढारी आणि कार्यकर्ते यांच्यासह सामान्य जनतेनेसुध्दा या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. सदरील मनाई आदेश दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २९ ऑक्टोबर २०२४ रात्री पर्यंत लागू करण्यात आला असून आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील बॅंका, शासकीय कार्यालये, विद्युत प्रकल्प महत्वाच्या कार्यालयातील परवाने असलेली शस्त्रे वगळता इतर परवानाधारकांची शस्त्रे जमा करणे व आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित परवानाधारकांना शस्त्रे परत करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील पोलिस प्रशासने करावी. जिल्ह्यातीच्या सीमेवर असणाऱ्या आंतरजिल्हा चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्हात काळा पैसा वापरणे , रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल होत असल्याची माहिती असल्यास यासंबंधीची माहिती देण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती नागपूर आयकर विभागाचे प्रधान संचालक तथा कार्यालयाचे उपसंचालक यांनी दिली सदरील माहिती टोल फ्री क्रमांक १८००२३३०३५५,१८००२३३०३५६ या क्रमांकावर कॉल करावा तसेच व्हिडीओ आणि छायाचित्रे ९४०३३९९०९८ तर nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला असून यादरम्यान शस्त्रे,सोटे, काठी, तलवार, बंदूक, जवळ बाळगता येणार नाही काठ्या, लाठ्या, शारीरिक इजा होण्यासाठी कारणीभूत ठरतात सहज हाताळता अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत दाहक पदार्थ किंवा विस्फोटक वापरता येणार नाहीत.
दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फोडायची किंवा फेकायची उपकरणे गोळा करून ठेवतात येणार नाही किंवा बाळगता येणार नाही, आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाही,
सभ्यता, नितीमत्ता यास बाधा येईल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अराजकता माजेल अशी चित्रे ,निशाणी , घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू बाळगता येणार नाहीत,
जाहिरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे,वाद्य वाजवणे, अशी कोणतीही कृती जी देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरूध्द असेल किंवा देशाचा मान सार्वभमत्व यांना इजा पोहचणार कृत करता येणार नाही
सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पहोचवणाकरी ,जाहिरपणे प्रक्षोभकभाषणे व असभ्य वर्तन करता येणिर नाही व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा सामावेश असलेल्या कोणत्याही जमावाला परवानगीशिवा येता येणार नाही किंवा मिरवणूक मोर्चा काढ़ता येणार नाही .
महाराष्ट्र राज्य पोलिस कायदा ३७(१)(३) अन्वये काढलेल्या मोर्चात ,आंदोलनात किंवा धरणे आंदोलनात पाच किंवा त्यापेक्षा जास्त सामावेश असलेल्या कोणत्याही जमावाला परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील