मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/वडवणी दि: ०१ जून २०२४ वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा तलावातील पाणी पातळी घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी येत नाही म्हणून गेल्या दोन दिवसापासून शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर तातडीने उपाययोजना करून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वडवणी नगर परिषदचे मुख्याधिकारी, पदाधिकारी ऐन उन्हात दिवसभर तलावावर थांबून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. वडवणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत असलेल्या सोन्ना खोटा येथील धरणाची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी येत नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शहराला वेळचेवेळी व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, नगराध्यक्ष पती शेषराव जगताप, पाणीपुरवठा सभापतीसह नगरपंचायतच्या वतीने तलावातील पाणी विहीरमध्ये घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. नगरपंचायत चे पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तलावातील विहिरीवर असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन दिवसात तलावातील पाणी विहिरीत घेण्यात येईल व पाणीपुरवठा सुरळीत होईल यासाठी नगरपंचायत चे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असून जनतेने पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याची बचत करावी व पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आव्हान नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.