सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : २५ जून २०२४ अंबाजोगाई येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा शाखा बीड (पूर्व ) अंतर्गत आणि अंबाजोगाई शहर शाखेच्या वतीने, दिनांक 23/06/2024 रविवार रोजी, ‘संबोधी बुद्ध विहार’ भीमनगर (परळी वेस ), अंबाजोगाई येथे एक दिवसीय ” युवती धम्म प्रशिक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 35 युवतींनी सहभाग घेतला. या शिबीरासाठी आद. ज्योतीताई कुंटे (केंद्रीय शिक्षीका , मा. श्रामणेरी व जिल्हा सरचिटणीस, नांदेड) यांनी 1) अर्थासह त्रिसरण व पंचशील, 2) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र 3) भगवान बुद्धांचे चरित्र ; या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर आद. संजिवनीताई धन्वे (केंद्रीय शिक्षीका व उपाध्यक्ष महिला ता. अंबाजोगाई ) यांनी 4) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांना संदेश ; या विषयांवर सखोल मार्गदर्शन करून सांस्कृतिक कार्यक्रम घेतला . या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शहर शाखा अध्यक्षा, आद . भावनाताई कांबळे यांनी भूषविले. जिल्हाध्यक्ष आद. बी. बी. धन्वे यांनी शिबीराचे उदघाटन केले. आपल्या उदघाटनपर मार्गदर्शनात युवतींच्या भावी जिवनात या शिबीराचा कसा उपयोग होईल हे समजाऊन सांगितले. संपूर्ण शिबीराचे बहारदार सूत्रसंचालन आद. जयश्रीताई गावडे यांनी केले. ता. शाखेचे संस्कार उपाध्यक्ष, आद. प्रा. डाॅ. किर्तीराज लोणारे यांनी तथागत भ. बुद्धांनी स्त्रियांना व मुलींना केलेला उपदेश व पत्नींचे प्रकार सांगून मार्गदर्शन केले. जिल्हा ऑडीटर आद. एम. वाय. काळे यांनी युवतींना पंचशील व बाविस प्रतिज्ञांचे आचरण करून आदर्श बौद्ध युवती बनावे; अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आद. रमेशराव सिरसट ( पोलीस उप निरीक्षक ) यांनी सर्व शिबीरार्थी व सर्व उपस्थितांना स्वादिष्ट भोजन देऊन आपली दान पारमिता पालन केली ; याबद्दल त्यांचे व त्यांच्या आई आद. शकुंतलाआई सिरसट , व पत्नी आद. बबिताताई सिरसट तसेच आद. अनिताताई विद्यागर, आद. मोनिकाताई सिरसट, आद. मिनाताई सुशांत वेडे यांचे व सर्व उपस्थितांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. या शिबीरासाठी आद. एस. एस. सोनवणे (जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष ), आद. सुधाताई जोगदंड (मा. संघटक, जि. बीड पूर्व ), आद, डी. एन. घोबाळे (ता. अध्यक्ष, अंबाजोगाई), आद. प्रा. श्रीपतराव वाघमारे (कोषाध्यक्ष, ता. अंबाजोगाई ), आद. अरूणाताई वाघमारे ( संस्कार उपाध्यक्ष, अंबाजोगाई शहर), आद पुष्पाताई गायकवाड (पर्यटन उपाध्यक्ष अंबाजोगाई शहर ), आद रत्नमालाताई तरकसे ( संस्कार सचिव अंबाजोगाई शहर ),आद उर्मिलाताई वैद्य (संघटक अंबाजोगाई शहर), आद. सुशिलाताई वेडे ( संघटक अंबाजोगाई शहर ) उपस्थित होते. शिबीराच्या शेवटच्या सत्रात कु. आदिती भीमराव वाघमारे, कु. अपूर्वा उमेश गाडे, कु. साक्षी सुशांत वैद्य, कु. तमन्ना बाबासाहेब वेडे या युवतींनी आपले मनोगत व्यक्त करून, हे शिबीर आमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त केला व आम्हाला शिबीर देऊन उपकृत केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे व जिल्हा, तालुका व शहर शाखा पदाधिकारी यांचे आभार मानले. आद. रमेशराव सिरसट यांनी अन्नदान देऊन दान पारमिता पूर्ण करण्याचे कुशल कर्म करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे व पदाधिकारी यांचे आभार मानले . हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गौतमी महिला मंडळ भीमनगरच्या आद. उर्मिलाताई वैद्य, आद. शकुंतलाताई वेडे ,आद. पार्वतीताई वेडे , आद. मंगलताई बचाटे, आद. कांताताई बोराडे ,आद. सारिकाताई ठोके , आद. अविदाताई वेडे, आद. सिताताई मस्के, आद. मिराताई गाडे आद. दीक्षाताई आदमाने, आद. सिमाताई वैद्य , आद. चंद्रकलाताई वेडे , आद. लक्ष्मीताई वैद्य, आद. ज्योतीताई वैद्य ,आद. लंकेश वैद्य सर , आद. व्यंकटराव वेडे सर आद. शशिकांत सोनकांबळे व कुलदीप वैद्य यांनी परिश्रम घेतले.











