अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी शहरात वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकासह नागरिक त्रस्त आहे. उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठे शहर ढाणकी म्हणून ख्याती आहे. ढाणकी शहराची लोकसंख्या ३५ ते४० हजार लोक संख्येने शहर विस्तृत असून शहरात अनेक कॉलेज पतसंस्था,बँका,तसेच बाजारपेठ सुद्धा खूप मोठी आहे. शहरात वाहन चालकाची खूप गर्दी असते. काही जणांचे दुचाकी वाहन रस्त्याच्या कडेला लावलेले असते, तर कोणी रस्त्यात गाडी लावून कुणाला बोलत उभे राहतात.शहरात मुख्य रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे दुचाकी, चारचाकीसह इतर वाहने रस्त्यावर उभी राहत असल्यामुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी दिवसभर सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांची दमछाक होताना दिसून येते. नागरिकासह विद्यार्थी व व्यापारी सुद्धा या ट्राफिकमुळे त्रस्त आहे. अनेक टू व्हीलर वाले भाईगिरी करत असतात. उलट सुलट रस्त्यात लावलेल्या वाहनांमुळे व ट्राफिक मुळे पायी चालणे सुद्धा जिकिरीचे झाले आहे. परंतु या ट्राफिक वर कुणाचाच अंकुश नाही. सर्व नियम व अटी धाब्यावर ठेवून वाहतुकीची कोंडी होत आहे .सध्या पेरणीचे दिवस चालू आहे त्यामुळे मार्केटला खूप गर्दी आहे. शेतकऱ्याचे खत ,बी , बियाणे खरेदी करणे, बँकेतील व्यवहार यामुळे अधिकच गर्दी दाटून येत आहे. कोणतीही दुर्घटना होण्याआधी उपाय योजना केलेल्या बऱ्या परंतु एवढी दमदाटी होत असताना सुद्धा अद्याप अनियंत्रित वाहनचालकांवर तसेच वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या समस्या वर कुणाचेच नियंत्रण नाही. तसेच ढाणकी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. याचा सुद्धा तत्काळ पोलीस प्रशासनाने विचार करावा आणि दुकान लाईन मार्केट ला कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावा तसेच शहरात चोरी गेलेल्या मोटर सायकल चा छडा लावण्यात यावा. व दुचाकी चोरट्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ढाणकी यांच्यावतीने देण्यात आले.यावेळी बाळू पाटील चंद्रे, रुपेश भंडारी माधव आलकटवार , राजू सावतकर, नामदेव गोपेवाड, अमोल तुपेकर, किशोर ठाकूर, शेख झहीर भाई ,रमेश गायकवाड, गजानन मिटकरे , वामन मुनेश्वर ,शिवाजी वैद्य, खंडेराव लकडे ,दत्ता हाके, जुबेर पठाण सर ,प्रवीण धो, हाकीत आली नवाब ,प्रवीण जैन आदी उपस्थित होते.


