स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरातील दैनिक औदुंबर वार्ता चे शहर प्रतिनिधी शेख इरफान यांच्यावर त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम चालू असताना. त्या ठिकाणी काही लहान मुलाची भांडण चालू असतं शे. इरफान हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता. तेथे हजर असलेल्या शेख मजहर, शेख अलाउद्दीन, शेख अजहर हे अचानक आले. व शिवीगाळ करून मला पकडू लागले. त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने माझ्या डोक्यावर डाव्या बाजूला मारून जखमी केले. तसेच अरीश खतीब यांनी मला लाथा बुक्याने मारहाण करून. जीवानी मारण्याची धमकी दिली. वरील तीनही आरोपी लहान मुलाची भांडण सोडवण्यासाठी का आला या कारणावरून वाद करून मला चाकू मारून जखमी केले. असे शेख इरफान यांनी शासकीय विश्रामगृह पत्रकार संघटनेमध्ये बोलते वेळेस सांगितले. सदर तीनही आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून ते कधी काय करतील याचा नेम नाही. अशी तक्रार शे. इरफान यांनी पोलीस स्टेशनला दिली. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघटनेच्या झालेल्या सभेमध्ये पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे व कलम ३०७ गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती केली असल्याची शे. इरफान यांनी सांगितले.


