बम बम भोलेचा नारा लावत यात्रेकरू अमरनाथच्या दर्शनासाठी रवाना
कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार:तळोदा दि.२४- आज सकाळी सकाळी तळोद्यातून बम बम भोलेचा नारा लावत ३५० भाविक अमरनाथ यात्रेसाठी मार्गस्थ झाले.यात्रेत जाणाऱ्या भाविकांना निरोप देण्यासाठी मित्र,आप्तेष्ट,नातेवाईक यांची गर्दी उसळली होती.अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी तळोद्यातून मोठ्या संख्येने भोले बाबाचे भक्त दर्शनासाठी यात्रेला जात असतात.यावर्षी देखील तळोद्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी निघाले असून मागच्या दोन महिन्यापासून या यात्रेचे नियोजन सुरू होते.ऑनलाइन रजिस्टर करण्यापासून ते सामानाची जमवाजमव करण्यापर्यंतची कामे भाविक करत होते.शेवटी आज ३५० भाविक यात्रेसाठी रवाना झाले. यात्रेला जाणाऱ्या भाविकांना निरोप देण्यासाठी मित्रपरिवार व नातेवाईक यांची गर्दी जमली होती. भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा अशा शुभेच्छा देत होते.अनेक भाविक तर सपत्नीक सहकुटुंब यात्रेला रवाना झालेत, “सकाळी तळोदा येथून भाविकांनी खाजगी बसने इंदोरकडे प्रस्थान केले.रात्री अकरा वाजेला इंदोर येथून जम्मू साठी रेल्वेने प्रवास सुरू होईल. दुसऱ्या दिवशी दि.२५ रोजी मंगळवारी रात्री अकरा वाजेला जम्मू येथे भाविक पोहचतील व तेथे मुक्काम करतील. दि.२८ शुक्रवार रोजी जम्मू येथील आर्मी बेस कॅम्प यांचा सोबत पहलगाम येथे पोहोचणार . शनिवार (दि.२९) रोजी सकाळी प्रत्यक्ष बाबा बर्फानीच्या पदयात्रेला सुरुवात होईल. दोन दिवस पायी प्रवास झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक तारखेला बाबा बर्फानी चे दर्शन होईल .दर्शन झाल्यावर त्याच दिवशी परतीचा प्रवासाला सुरवात होईल. तेथून जम्मू येथे दोन तारखेला सायंकाळी पोहचल्यावर मुक्काम व तीन तारखेला रेल्वेने परतीच्या प्रवास इंदोर पर्यंत होईल..” या यात्रेचे संपूर्ण नियोजन तळोद्यातील बाबा बर्फनीचे असीम भक्त संदीप होळकर, कपिल परदेशी, केतन तांबोळी, भूषण परदेशी, संदीप उदासी, कैलास शेंडे.. व सर्व मित्र परिवार


