दिनानाथ पाटील
तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : डोंगरगाव ता. शहादा येथील सरस्वती विद्या मंदिर, मुक्ताई माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात व लेझिम पथकाच्या नृत्याने, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने निरोप दिला. यावेळी संस्थेच्या सचिव मुक्ता ताई पाटील, शैक्षणिक समन्वयक प्रा. डी. सी. पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, माध्यमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रा. निशिगंधा पाटील आदी उपस्थित होते. शिशु वाटिका आणि पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची मूर्ती तयार केली होती. त्यातील सर्वोत्कृष्ट मूर्तीला प्रथम पूजनाचा मान देण्यात आला होता. श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारातच तयार केलेल्या हौदात करण्यात आले.


