व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी विधानसभा क्षेत्राचे अन्न व औषधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी लक्ष देण्याची मागणी
अहेरी गडचिरोली जिल्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा रोमपली नाल्यावरील रपटा वाहुन गेल्याने प्रवाश्यांची दुर्दशा तसेच रस्त्याच्या दूरवस्थेमुळे वाढले अपघाताचे प्रमाण गडचिरोली जिल्यातील काही भागात अत्यन्त दयनीय रस्त्याचे बांधकाम होत असून शासन व प्रशासन लक्ष देण्याची मागणी जोर धरीत आहे. मुख्यालयापासून आलापल्ली ते सिरोंचापर्यंत शंभर किलोमीटरचा रस्ता हा 153 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये मोडतो. मात्र, या महामार्गाची दूरवस्था ग्रामीण भागातील पायवाटेपेक्षाही दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे या महामार्गावरचा प्रवास जीवघेणा झाला रोमपली जवळील नाल्या चा रपटा वाहुन गेल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत आहे याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी व ठेकेदार आहेत.हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था एखाद्या खेडेगावातील रस्त्याहूनही बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. या वाईट अवस्थेतील मार्गामुळे अनेक अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काही अपघातात नागरिकांना जिवालाही मुकावे लागले. या मार्गावर इतक्या प्रमाणात अपघात होत असतानासुद्धा शासन व प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे, की असा सवाल जनतेतून होत आहे. आपले अहेरी विधानसभा क्षेत्राचे अन्न व औषधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तातडीने लक्ष देण्यात यावी.