व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : पुढील काळात विविध समाधानचे धार्मिक सण वीना अनुचित घटना घडता योग्य व शांततेत पार पडण्यासाठी सर्व जाती धर्माच्या मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी आहेरी येथे केले. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची सभा पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नियोजनात करण्यात आली होती. ईद-ए-मिलाद, गणेशोत्सव, नवरात्र व इतर वेगवेगळ्या धर्मांचे बांधव एकत्र येऊन साजरे करीत असतात. मात्र यात कोणी व्यक्ती अनुचित घटना घडविण्याचा प्रयत्न करीत असेल त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडल्या जाऊ शकते अशा व्यक्तीची माहिती सर्व धर्माच्या मान्यवरांनी पोलिसांना याची सूचना द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी केले. आनंदाने , शांततेत सर्व धर्माचे सण साजरे करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित सर्व धर्माच्या सामाजिक पक्षांच्या प्रतिनिधींनी केले. शांतता कमिटीच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार, नगरपंचायतीच्या अध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,सामाजिक कार्यकर्ते तालीब सय्यद,भारतीय जनता पार्टीचे संदीप कोरेत,किशोर शंभरकर,जलीलुद्दीन काझी,नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अतुल उईके,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ पप्पू हकीम, बबलू सदमेक,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर मद्देरलावार ,कन्हैयालाल रोहरा,अब्दुल शफीक शेख, गणेश दुर्गे , भिमराव झाडे,सुचित कोडेलवार,नागेश ,संजय कोंडागुरला,जमीर शेख,संगीता काडूलवार, लक्ष्मीबाई कुळमेथे उपस्थित होते.


