व्यकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : युवा ग्रामीण पत्रकार संगठना गडचिरोली जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यातील अध्यक्ष सचिव निवड करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना गणेश कचकलवार म्हणाले की, आपल्या सघटनेची बातमी महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात सुरू आहे संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवाचे तसेच गोर , गरीब व अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळुन देण्याचा प्रयत्न सातत्याने प्रयन्त करीत असतात त्यांनी सांगितले युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार याच्या अध्यक्षतेखाली तर गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मधूकर गोंगले यांच्या सुचनेनुसार मधुकर संडमेक यांची ग्रामीण युवा तालुका जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व सचिव पदी व्येकटेश चालुरकर यांची नियुक्ति जाहीर पणे करण्यात आली, यांची निवड करुन नियुक्ति पत्र देण्यात आले आणि संंघटनेचे सदस्य म्हणून सुरेश मोतकुरवार राकेश येंलकुचीवार मोहसीन शेख,हरीश पब्बावार यांनी शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले महिला जिल्हा अध्यक्ष सौ निलीमाताई बंडमवार जिल्हा सचिव भास्कर फरकडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शूभेच्छा दिल्या.