प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : योगेश्वर बुवा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकारांच्या विविध प्रकाराच्या समस्यांसंदर्भात शासनाला निवेदन सादर करण्यात आले असून अक्कलकुवा येथील तहसीलदार रामजी राठोड व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भारतीय दंड विधान कलम 353 च्या दुरुपयोग करण्यात येतो व पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कलमाचा धाक दाखवून पत्रकारांना निर्भीडपणे पत्रकारिता करण्यापासून रोखले जाते. त्यामुळे 353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात ज्या काही पत्रकारांवर 353 सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी ,पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे, पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना करावी, तालुका व जिल्हास्तरीय विविध समित्यांवर पत्रकारांना प्राधान्याने नियुक्त करावे, अवैद्य व्यावसायिक, वाळूमाफिया व गाव गुंडांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले व विनाकारण होणारा त्रास या संबंधित पोलीस ठाण्यांकडून वेळोवेळी संरक्षण मिळावे, याबरोबरच इतर अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार रामजी राठोड व उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, जिल्हा संपर्कप्रमुख कमलेश शिंदे यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले.