राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी,अमरापूर
अमरापूर: कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माहनिमित्त आबासाहेब काकडे विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळा या ठिकाणी श्रमदान करत गोशाळा परिसराची स्वच्छता केली.यावेळी विद्यार्थ्यांना गोधनाचे महत्त्व ह भ प श्रीहरी महाराज घाडगे यांनी समजावून सांगितले,यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गोधनाच्या सहवासात जाऊन गोठ्यातील दोन ट्रॉली शेणखत उचलून एका ठिकाणी जमा केले. तसेच परिसराची झाडलोट करून स्वच्छता केली. तसेच हे श्रमदान झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परतीच्या प्रवासामध्ये शाळेमध्ये तयार केलेले सीड बॉलचे पैठण रोडवरील रस्त्याच्या कडेला रोपण केले.या उपक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते सर यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांचा श्रमदानाचा उत्साह पाहण्यासारखा होता.याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग मॅडम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम पुष्पलता गरुड मॅडम,विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका शीला धिंदळे मॅडम व सहशिक्षक योगेश तायडे सर यांनी देखील विद्यार्थ्यांसोबत श्रमदान करत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला,यावेळी विद्यार्थ्यांच्या श्रमदानचे व स्वच्छतेचे कौतुक करत हभ प श्रीहरी महाराज घाडगे यांनी विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले व या उपक्रमाचे कौतुक देखील केले.