ज्ञानेश्वर डिवरे
तालुका प्रतिनिधी अकोला
कापशी रोड :- पंचायत समिती अकोला अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रीय शाळा कापशी रोड येथे 11जुलै रोजी इयत्ता पहीलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा क्र २ पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा कापशी रोड शाळेत आयोजित शाळा पूर्वतयारी मेळाव्याला मा.आमदार श्री.रणधीरभाऊ सावरकर, मा.सरपंच अंबादास भाऊ उमाळे, जि.प.सदस्य ठाकरे साहेब, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.वाकोडे साहेब शाळा पूर्वतयारीचे राज्य समन्वयक पंकज धुमाळे यांनी भेट दिली. मा.आमदार साहेबांनी व मा.पंकज धुमाळे सर यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले.