शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
१९५३ साली गोविंदराव शेंबेकर यांचे संकल्पनेतून व लोकसहभागातून कृषी विद्यालय या संस्थेची स्थापना अत्यंत ग्रामीण भाग असलेल्या शेबा या गावात झाली बुलढाणा ज़िल्ह्या मधील सर्वात जुना स्थापन झालेल्या विद्यालयापैकी एक होय. आज जवळ पास ७० वर्ष या संस्थेला पूर्ण होत आहे.हा सात दशकांचा प्रवास आजही निरंतर चालू आहे. कितीतरी विध्यार्थी या विद्यालया मधून ज्ञान ग्रहण करून मोठे उच्च पदस्थ अधिकारी झाले, शासकीय, निमशासकीय, पद भूषविली प्रेत्येक क्षेत्रात, कृषी,राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, उच्च दर्जाजे खेडाळू या विदयालयाने बनविले परंतु तीच इमारत आज शेवटची घंटा मोजत आहे. परंतु याच क्षणी पुन्हा देवदूत म्हणून आदरणीय गोविंदाराव शेंबेकर चिरंजीव चिरंजीव माधरावजी शेंबेकर यांनी पुण्य कर्माची ही संधी हेरत, जुन्या इमारतीचे पूर्ण प्लास्टर, इमारतेवरील पूर्ण टिनपत्रे, दरवाजे, खिडक्या, खालील कोबा अश्या एकूण १६ जुन्या वर्ग खोल्यांचे नूतनीकरणा चा निर्णय अंदाजीत खर्च 35 लाख देऊन आपल्या वडिलांचा वसा प्रज्वलीत केला आणि पुन्हा एकदा आदरणीय गोविंदराव शेंबेकर यांची आठवण ताजी झाली. बांधवानो आज आपण याच विद्यालयामधून ज्ञान संपादन करून व्यावहारिक जगा मध्ये जगात आहो, आपण आज जे काही आहोत ते याच विद्यालयामुळे आहोत म्हणून या विदयालयचे ऋण आपण कुठेच फेडू शकत नाही